कळंब (प्रतिनिधी)- कळंब उप जिल्हा रुग्णालयात सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी रूग्ण कल्याण समिती ची बैठक उस्मानाबाद जिल्ह्या शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी रूग्ण कल्याण समितीच्या सदस्यांनी विविध विषयांवर चर्चा करून उपाय सुचविले. त्यामध्ये रूग्णांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच आरो सिस्टीम बसविण्यात येणार असून प्राथमिक सर्व्हे झाला आहे. येत्या आठ दिवसात आरो ची मशीन बसविली जाईल असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांनी सांगितले. यासाठी वाढीव पाईपलाईनसाठी न. प. प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. कळंब येथे लवकरच कायमस्वरूपी भूलतज्ज्ञ देण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले.
येथील 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय, स्त्री रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठी सदरील जागा अपुरी पडत आहे. कळंबकरांनी जागा उपलब्ध करून दिल्यास वरील सर्व प्रश्न प्रशासकीय स्तरावर लवकरात लवकर मार्गी लागले जातील असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर यांनी सांगितले. यावेळी रूग्ण कल्याण समिती सदस्य डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ पुरूषोत्तम पाटील, डॉ मंजुराणी शेळके, डॉ सायस केंद्रे, डॉ सुधीर औटे, डॉ शरद दशरथ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सय्यद, दत्तप्रसाद हेड्डा, न. प. चे प्रतिनिधी, महिला व बालकल्याण केंद्र प्रतिनिधी बोराडे ताई उपस्थित होते.