नळदुर्ग (प्रतिनिधी)-तुळजापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील हे विजयी झाल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शहरातून भव्य विजयी मिरवणुक काढली. येथील बसस्थानक परिसरात मोठया प्रमाणात फटक्यांची अतिषबाजी करीत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थीतीत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी 9 वाजल्यापासूनच पहिल्या फेरीपासून राणाजगजितसिंह पाटील हे आघाडीवर होते. दरम्यान दुपारी एकच्या सुमारास राणाजगजितसिंह पाटील यांची मोठी आघाडी पाहता कार्यकर्त्याकडून मोठया प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्याच बरोबर येथील बसस्थानक परिसरात संविधान चौकात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी तालुका अध्यक्ष विजयकुमार शिंगाडे, शहर भाजपा अध्यक्ष धिमाजी घुगे, भाजपाचे नेते सुशांत भुमकर, पांडू पूदाले, विशाल डुकरे, पदमाकर घोडके, गणेश मोरडे, बबन चौधरी, शिवेसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शहराध्यक्ष शिवाजी सुरवसे, शहर पत्रकार स्ंघाचे अध्यक्ष सुहास येडगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, संजय विठठल जाधव, पत्रकार उत्तम बनजगोळे, अमर भाळे, यांच्यासह बहुसंख्य महायुतीचे कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शहरातून सर्व कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली.  

 
Top