धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2024-25 चा 21 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार (दि.22) रोजी राजर्षी शाहू ट्रस्टचे तज्ञ विश्वस्थ चंद्रकांत माळी व ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक-नारीकर यांचे हस्ते प्रथमतः वजन काटयाचे पुजन करुन तद्नंतर विधीवत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गव्हाण पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक संचालक ॲड, चित्राव गोरे यांनी केले. त्यात त्यांनी चालू हंगामासाठी एकूण 8500 हे. ऊस नोंद झाली असून हेक्टरी 80 मे.टन उत्पादन गृहीत धरून एकूण 650000 मे. टन ऊस उपलब्ध असून इतर विल्हेवाट चजा जाता 5 लाख मे.टन ऊस आपणास उपलब्ध होत असल्याचा तपशील शेतकयांसमोर मांडला. यावर्षी बैलगाडी 200, मिनी 150, मोठे वाहने 65 8 हार्वेस्टर 30 अशी भक्कम यंत्रणा कारखान्याकडे उपलब्ध असून कारखाना आज गाळप हंगाम चालू करण्यासाठी सज्ज आहे. तसेच यावर्षी चांगले गाळप होईल असे अपेक्षित असल्याचे सांगीतले. तसेच लचकर पक्व होणाऱ्या व साखर उतारा चांगला असणाऱ्या ऊस जातीमध्ये कोसी 671 च एमएस 10001 या ऊस जातीची लागवड शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करावी जेणे करून शेतकऱ्यांच्या ऊसाला जादाचा दर देता येईल. तसेच कारखान्याने यावर्षी केलेल्या धोरणाप्रमाणे या दोन ऊस जाती लवकर पक्व होणार असल्याने पुढील वर्षी यांचा प्रोग्राम सुरुवातीला काढून चाकीच्या ऊस जातीचा नंतर प्रोग्राम काढला जाईल असे नमूद केले.

तद्नंतर प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यामध्ये चंद्रकांत माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ग्रामीण भागातील हा कारखाना 25 वर्षाच्या कालावधीतच एवढी मोठी होप घेऊ शकतो याचे आंबेडकर कारखाना एक उत्तम उदाहरण असल्याचे सांगीतले. त्यानंतर दूसरे पाहुणे ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांनी सांगीतले की, कारखाना उभारणी पासून गोरे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे हे फळ असल्याचे सांगीतले. तसेच गोरे दादा तेरणेचे 11 वर्षे चेअरमन होते. त्यानंतर 1992-93 ला ऊस जास्त झाला म्हणून अंदोलन झाले. यामध्ये सरकारने अनुदान दिले व यातूनच नविन कारखान्याची गरज भासत असल्याने दादांनी आंबेडकरांचा विचार केला व समविचारी मित्रांना एकत्र करून हा कारखाना उभा केल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच पुढील 50 वर्षे हा कारखाना सहकारी म्हणून राहण्याचे दृष्टीने यापुढेही सर्वांनी गोरे यांना असेच सहकार्य करावे असे सांगून आपले मनोगत संपवले.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांनी सभेस मार्गदर्शन करताना सांगीतले की, ऊस शेती हेच शेतकयांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असून कमी पाण्यात व कमी खर्चात शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आपला कारखान्यासाठी आजपर्यंत सर्वसाधारण शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यातूनच आपण आज संकटातून मार्ग काढ़त इतपर्यंत पोहोचली आहेत. आज 3 कोटी रकमेतून चालू केलेला कारखान्याची 300 कोटी संपत्ती झाली आहे. आपल्याला आवर्षण काळात पाण्याची गरज भासल्याने आपण 3-3 कोटीची दोन मोठी शेततळी निर्माण केली, तसेच ऊसापासून मिळणान्या पाण्यावर कारखाना चालवला. एखाद्या वर्षी कमी पाणी असताना आपण ऊस तुटून गेल्यावर फक्त पावसाच्या पाण्यावर ऊस जगवला, तसेच पाचट जाळण्याचे प्रमाण कमी होऊन त्याचे महत्य लोकांना सांगीतले. आपल्यापुढील निसर्ग आणि सरकारचे धोरण ही दोन संकटे आहेत. इथेनॉल बंदच्या धोरणामुळे कारखान्यास मोता आर्थिक तोटा सहन करावा लागला. या अशा सरकारच्या बदलत्या धोरणामुळे बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे सरकारने थकहमी घेऊन कारखान्यास कर्ज वाटप केले परंतू आपणास सरकारची मदत घेण्याची गरज पडली नाही, तसेच यंत्रणेमुळे आपणास मोठे धोके निर्माण झाल्यामुळे हार्वेस्टर वाढवण्याचा आपला मानस असल्याचे सांगीतले.

आपण नविन प्रोजेक्ट न करता आहे ती कारखानदारी कशी चालवता येईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. तसेच कार्यक्षेत्रातील शेतकन्यांनी आपल्या ऊसाची इतरत्र विल्हेवाट न करता आपल्याच कारखान्यास ऊस दिला तर सर्वांना फायदा होऊन हा कारखाना सहकार म्हणून जिवंत राहील. यावर्षी ही आपण सर्वांच्या सहकार्यातून संकटावर मात करून गाळप हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत, तद्नंतर कारखान्याचे सभासद, भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक, ऊस तोड/वाहतुक यंत्रणा च कर्मचारी/ कामगार यांचे सहकार्यातून येणारा गाळप हंगाम यशस्वी करण्याचे प्रतिपादन केले.

शेवटी कारखान्याचे व्हा. चेअरमन विलास ऊर्फ हनुमंत भुसारे यांनी कार्यक्रमास उपस्थितीत असलेले प्रमुख पाहूणे, सभासद, शेतकरी, संचालक मंडळ, हितचिंतक, पत्रकार, अधिकारी/कर्मचारी व चाहन ठेकेदार यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक श्री आयुबखों पठाण यांनी केले.

 
Top