भूम (प्रतिनिधी)- मौजे जयवंतनगर येथे महायुतीची उमेदवार यांनी आरोग्य दूत डॉ. राहुल घुले हे रासपाचे उमेदवार आहेत यांच्या विरोधात बोलताना आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला या डॉक्टरला जेलमध्ये टाकू असे टीका करत असताना बोलल्याने याचे प्रत्युत्तर म्हणून रासपाची उमेदवार राहुल घुले यांनी पत्रकार परिषद घेत अशी माहिती दिली. की मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहे आणि लोकांचा मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच मला सावंत यांनी धमकी दिली असा आरोप रासपाचे उमेदवार डॉ. राहुल घुले यांनी केला आहे.

पुढे बोलताना डॉ. घुले यांनी, मला माझ्या मूळ असलेल्या गावांमध्ये सभा घेऊन जे की गावचा मी असून ही माझी भूमी असताना मला हे कुठल्या कारणाने धमकी दिली गेली. ते जेलमध्ये टाकणार आहेत हे मला माहित नाही. परंतु मी या मतदारसंघाचे माझ्यावर असलेले ऋण फेडण्याच्या हेतूने हजारो लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना दिलासा देण्याचं काम केले त्याच सोबत हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जलालेली डीपी याची मोफत वाहतूक सुविधा देण्याचे कार्य केले. हजारो मायबाप यांना काठीचा आधार देण्याचे काम केले. विविध पद्धतीने मी कामे केली आहे. या कामामुळेच मला तानाजीराव सावंत जेलमध्ये टाकणार आहेत का असा प्रश्न विचारला किंवा मला मी कालच 500 रुपयांचा स्टॅम्प माझ्या ओबीसी बांधवांसाठी शपथपत्र समर्पित केला. मी आपल्या व आपल्या भागाच्या विकास कामासाठी सदैव कटिबद्ध राहून यामुळे मला जेलमध्ये टाकणार का ! मी करत असलेल्या या मतदारसंघातील समाजसेवेला सुद्धा या लोकांनी खिळ बसविण्याचा प्रयत्न केला. शासकीय अधिकाऱ्यांकडून आमची कामे लटकवत ठेवण्यात आली. या ना त्या अनेक कारणाने आमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा सर्वतोपरी त्रास आम्हाला न होता थेट नागरिकांना लाभ घेण्यापासून झाला आहे. गाड्या बंद केल्या तरी डहाणू पालघर येथे वैद्यकीय उपचारासाठी नागरिक जातच आहे. गाडी चालू केल्यामुळे एक लगत प्रवास होत होता. मात्र आता तीन ठिकाणी गाड्या बदलून जावा लागत आहेत. याचा त्रास नागरिकांनाच होत आहे. आम्हाला त्रास देऊ नका कारण आमचा त्रास हाच जनतेचा त्रास राहणार आहे आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊ नका, जेल माझ्यासाठी माहेर घर आहे. मी महाराष्ट्रातल्या नंबर एकच्या जेलचा वैद्यकीय इन्चार्ज राहिलेलो आहे. ते पण मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये. आपण मला अशा धमक्या देऊ नका. मी धमक्यांना घाबरणारा नाही यापुढे जसे मला प्रश्न मिळतील तसेच त्यांना उत्तर दिले जातील.


 
Top