धाराशिव (प्रतिनिधी)- संयोजनी ओमराजे निंबाळकर व डॉ. शुभांगी कुलदिप उर्फ धिरज पाटील या महीला ब्रिगेडनी तुळजापूर विधानसभा परीसर पिंजुन काढला. सोबतीला अनुभवी शिवसेना महिला नेत्या शामलताई वडणे यांचाही एकच संकल्प महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड.धिरज पाटील यांना आमदारकी जिंकुन देणारच.
प्रथम तुळजापूर शहरात डोअर टू डोअर प्रचार करून घरोघरी हळदी कुंकू कार्यक्रमाद्वारे प्रत्येक महीलेला अँड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब पाटलानांच मतदान करून हाताचा पंजा या ऐक नंबरवरील खुणे समोरील बटन दाबुन प्रचंड मतानी विजयी करा असे आश्वासन घेतले. तसेच संपुर्ण विधानसभा क्षेत्रात नळदुर्ग, तामलवाडी, सिंदफळ, काटी, सावरगाव, मसला, बारूळ, होर्टी, चिकुद्रा, मंगरूळ,सुरतगाव, खडकी,खानापूर, शिवाजीनगर तांडा, पिंपळा खुर्द, लोहगाव, बोरगाव, सलगरा, बोळेगाव, कुन्सावळी, सिंदगाव, हंगरगा नळ, मानेवाडी, जळकोटवाडी, टाकळी, केशेगाव, शिंदेवाडी सह सर्व 72 गावात गल्लोगल्ली फिरून अँड. धिरज कदम पाटील यांना विजयी करा असा जोरात प्रचार चालू आहे.
यावेळी डॉ. शुभांगी धिरज कदम पाटील आपल्या भाषणात म्हणाल्या की. आम्ही धिरज पाटील आमदार झाल्यास स्वतंत्र महिलाच्या विविध समस्या विषयी कार्यालयाची स्थापन करून तेथे प्रत्येक महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही प्रत्येक गावात महिला सभागृह बांधून देऊ, बचत गटांना प्रोत्साहन देऊ, महिलांचे आरोग्य सामाजिक असे विविध समस्या सोडवून महिलानां उद्योग धंदे निर्माण करू. असे आश्वासन खंबीरपणे देत आहेत. त्यांच्या बरोबर शोभाताई शिंदे, सुरेखाताई मुळे, वनिता पाटील, हर्षदा पाटील, अंजली कुतवळ, नीलम पाटील, दिपाली पाटील, गायत्री भोसले,उर्मिला जाधव, श्रद्धा पाटील, सोनाली पाटील, रेवती पाटील, तनुजा पाटील, दीक्षा पाटील, तृप्ती पाटील, करुणा पाटील, प्रिया पाटील, वैशाली पाटील, बालिका माळी ईत्यादी महिला कार्यकर्त्यां परीश्रम घेत आहेत.