तुळजापूर (प्रतिनिधी)-  नुकत्याच झालेल्या तुळजापूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मतांचा आकडा वाढूनही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.  तुळजापूर तालुक्याचा विचार केला तर मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेला मतांचा टक्का काही प्रमाणात वाढला असला तरी यश मात्र मिळाले नाही. याचे, चिंतन त्यांच्या पातळीवरही पक्ष नेतृत्वाला करावे लागणार आहे. यावर चिंतन आणि अभ्यास केला तरच आगामी काळात स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत या पक्षाला यश मिळू शकते. 

तालुक्याचा विचार केला तर लाडकी बहीण योजना खूप प्रभावी ठरल्याचे सध्या तरी दिसुन येत आहे. या निवडणुकीला वाढलेले युवा मतदार जे आहेत त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात दिसत आहे. युवा मतदारांचा  कौल हा महायुतीच्या बाजूने दिल्याने काँग्रेसचा पराभव या मतदारसंघात झाल्याचे बोलले जात आहे. तुळजापूर  विधानसभा मतदारसंघात 2019 ला माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी लढवली निवडणूक होती. 2019 च्या निवडणुकीत आमदार पाटील यांना 99034 मते मिळाले होते. तर काँग्रेसचे माजी मंञी मधुकर चव्हाण यांना 75865 मते मिळाले होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील 23169 मताने विजयी झाले होते. 2014 निवडणुकीत काँग्रेसचे मधुकर चव्हाण 70701 मते मिळवुन विजयी झाले होते. लोकसभा 2024 एकून मतदान 375562 झालेले मतदान 245637 खासदार ओमराजे निंबाळकर 138791 तर महायुती उमेदवार अर्चनाताई पाटील 86615 मते मिळाली. येथे महाविकास आघाडीला 52176 मताधिक्य मिळाले होते. या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातुन भाजपला 38 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. यात काँग्रेस उमेदवार अँड. धीरज पाटील यांना निवडणुकीत 94 हजार 984 मते मिळाली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेसचा मतांचा आकडा वाढला आहे. असे असले तरी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण प्रचारात सक्रीय नसल्यामुळेच काँग्रेस हारली आहे. मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर भाजपने आतापर्यंत दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. 2019 पासुन येथुन विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील विजयी होत आहे. जे आजपर्यत शिवसेना-भाजपला जमले नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस मधुन भाजपत गेलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी जमवुन आणले. भाजपने या मतदार संघात स्वकर्तत्वावर एकहाती वर्चस्व मिळविले आहे.  सध्या तरी आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी निर्माण केलेला तालुक्यातील प्रभाव रोखणे काँग्रेससाठी आव्हानात्मक राहणार आहे हे नक्की.

 
Top