तुळजापूर (प्रतिनिधी)- रा.प. महामंडळातील वर्ग- 1 व वर्ग- 2 अधिकारी तसेच वर्ग 3 व वर्ग- 4 कर्मचारी यांना दिवाळी भेट देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन होता. तद्अनुषंगाने दिवाळी भेट म्हणून दि. 31.10. 2024 रोजी रा.प. महामंडळामध्ये कार्यरत सर्व अधिकारी / कर्मचा-यांना  6 हजार रूपये इतकी रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा जवळपास 87 हजार अधिकारी, कर्मचारी यांना लाभ होणार आहे.

याबाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत यात  दि.31.10.2024 रोजी रा. प. सेवेत कार्यरत असलेल्या सर्व अधिका-यांना, कर्मचा-यांना

दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी 6 हजार रूपये इतकी रक्कम अदा करण्यात यावी. “दिवाळी भेट“ म्हणून अदा केलेली रक्कम लेखाशिर्ष 170 ई या लेखाशिर्षास र्खाी दर्शविण्यात यावी.  ज्या अधिकारी तसेच कर्मचा-यां बाबतीत कोणत्याही कारणास्तव देय होणारी रक्कम रोखून ठेवण्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी आदेश काढले असतील तर, या परिपत्रकान्वये संबंधित अधिकारी,  कर्मचा-यांस देय होणारी रक्कम अदा करण्यात येऊ नये. ज्या प्राधिका-याने अशी रक्कम रोखून ठेवण्याबाबत आदेश दिले असतील त्यांच्याच स्वाक्षरीने व संमतीने अशी रोखून ठेवलेली रक्कम दिवाळी भेट म्हणून अदा करावी.  दिवाळी भेटीची रक्कम करपात्र आहे याची नोंद घ्यावी. अधिसंख्य पदावर कार्यरत असणा-या अधिकारी, कर्मचा-यांना सदर भेट देय राहील, असे  परिपत्रकात म्हटले आहे. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वाक्षरी निशी हे परिपञक काढले आहे.


 
Top