उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा लोहारा तालुक्यांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उमरगा शहरातील भीमनगर येथील असंख्य युवकांसह महिलांनी आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या सर्वांनी चौगुले साहेबांच्या विकासकार्याने प्रेरित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशामुळे उमरगा शहरातील शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार असून, स्थानिक राजकारणात नवीन दिशा मिळणार आहे.

प्रकाश सोनकांबळे, सिद्धार्थ सोनकांबळे, चंद्रकांत सोनकांबळे, नितीन कांबळे, ऋषी सरपे, बजरंग सोनकांबळे, गजानन सोनकांबळे, बळीराम,गायकवाड, शेखर सरपे, प्रेम कांबळे, विजय सूर्यवंशी, सुमित कांबळे, प्रज्वल गोळे, आलोक कांबळे, दिगंबर कांबळे, पात्रे दीपक, पिंटू गायकवाड,सबस गायकवाड, अभिजीत कांबळे, प्रतीक कांबळे, प्रबुद्ध कांबळे, यश शिंदे, रेहान पटेल, गणेश कांबळे, हर्षद शिंदे, समीर कांबळे, निखिल बिद्रे, मंगेश अंधारे, अभिजीत लोहार,शुभम कांबळे, हरी चव्हाण, चंद्रकांत कांबळे, शिवाजी पुरातले, अनिकेत वजनम, किरण आबाचने, रितिक आबाचने, राहुल पुरातले, अविनाश सुरवसे, रोहन आबाचने, पवन आबाचने, श्रीकांत क्षिरसागर, सचिन आबाचने, रोहित आबाचने, राहुल भालेराव, नरेश सोनकांबळे, विकास कांबळे, बाळू सोनकांबळे, ईश्वर बनसोडे, बळीराम गायकवाड, प्रदिप सरपे, यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व नव्याने प्रवेश केलेल्या युवकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन जाधव, विधानसभा संघटक शरद पवार, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख संदिप चौगुले, आदी उपस्थित होते.


 
Top