तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा स्पर्धा विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विभाग स्तरीय निवड चाचणी 2024-25 क्रिकेट स्पर्धा 14 वयोगट मुलांच्या स्पर्धेसाठी हर्षवर्धन गणेश चादरे यांची निवड करण्यात आल्याचे पत्राद्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
हर्षवर्धन हा आपल्या खेळाच्या माध्यमातून सर्वच स्तरावरील स्पर्धा चाचण्यांमध्ये पात्र होऊन धाराशिव जिल्ह्याचे नावलौकिक वाढवेल हा विश्वास व्यक्त करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी हर्षवर्धन चादरे यांच्या निवडीचे अभिनंदन करून त्याला पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन गणेश चादरे हा मूळचा आपसिंगा ता तुळजापूर येथील असून सध्या अयोध्या नगर तुळजापूर येथे वास्तव्यास आह. हर्षवर्धन हा ग्रीन लँड स्कुल धाराशिव येथे इयत्ता 8 मध्ये शिकत असून तो खेळाबरोबरच अभ्यासात ही अतिशय हुशार असून निश्चितच तो विभाग स्तरावरील स्पर्धेबरोबरच राज्य व राष्ट्रीय स्तरावर ही पात्र होऊन ग्रीन लँड स्कुलचे नावलौकिक वाढवेल. हर्षवर्धनची निवड ही आमच्या स्कुलसाठी अभिमानाची व आनंदाची बाब असल्याचे स्कूलच्या प्राचार्या स्वामी मॅडम यांनी सांगितले.
लहानपणापासुनच मला क्रिकेटची आवड असून मला नॅशनल व इंटरनॅशनल स्पर्धांच्या माध्यमातून माझ्या धाराशिव जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करायचे असल्याचे हर्षवर्धन चादरे यांनी त्याच्या निवडी बद्दल सांगितले. हर्षवर्धन गणेश चादरे यांची विभाग स्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.