कळंब (प्रतिनिधी)- देवांचे वैद्य धन्वंतरी यांचे जयंती धनत्रयोदशी या दिवशी आरोग्य देवता धन्वंतरीची पूजा केली जाते या निमित्ताने रुग्णावर उपचार करून व त्यांना जीवनदान देणारे डॉक्टर्स यांचा सन्मान केला जातो. कळंब येथे गेली पन्नास वर्ष डॉक्टर म्हणून  रुग्णावर उपचार तसेच हजारो सर्पदंश झालेल्यानां जीवनदान देणारे सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माणिकराव डिकले यांचा धनत्रयोदशी निमित्त दिनांक 29 ऑक्टोबर रोजी पुष्पहार व श्रीफळ देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने महादेव महाराज अडसूळ, विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे, पापा लोढा, दत्तात्रेय तनपुरे जयंत लांडगे, भारत जाधव काशिनाथ घुले, श्याम खबाले,  ईरफान शेख, खुर्शीद शेख, दिगंबर वाघमारे यांनी सत्कार केला.


 
Top