धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीकरीता कंबर कसली आहे. मागील काही वर्षामध्ये सत्ता बदल करत भाजप महाराष्ट्रामध्ये सत्तेत आले ही गोष्ट लोकांना रुचली नाही. मा.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये कोरोणा सारख्या महामारीवर विजय मिळवला. तसेच महाराष्ट्राच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेत अनेक विकास कामांना मंजुरी दिली याचा परीणाम म्हणून महाराष्ट्रामधील लोकसभेच्या उमेदवारांना भरभरुन मते दिली. धाराशिव जिल्हयाचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांनी भाजपामधून शिवसेना  उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठया प्रमाणात प्रवेश केला आहे. 

 शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून  माझ्यासह आमदार कैलास दादा पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत येडशी येथील माजी उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष उपसरपंच  गजानन नलावडे ग्रा पं सदस्य मनोज गुरव, मिलिंद नलावडे यांनी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला .

यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते,काका शिनगारे,परवेज शेख,विशाल जमाले, गजेंद्र जाधव, दिनेश बंडगर, विनोद पवार, अमर भातलवंडे,रवी कोरे,सुनील शेळके, आदींसह  पदाधिकारी, शिवसैनिक  उपस्थित होते.

इटकूर ता कळंब येथील अभयसिंह दत्तात्रय आडसुळ, अजितसिंह प्रतापराव पाटील, रोहित आबासाहेब आडसुळ, ओम श्रीनीवास गंभीरे,उमेश दत्तात्रय आडसुळ,अजयसिंह विलासराव पाटील,सचिन सर्जेराव आडसुळ,खंडेराव हनुमंतराव गंभीरे,बळीराजे गंभीरे,जयदेव गंभिरे,नवनाथ आडसुळ,गोकुळ फरताडे यआदी युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल,असा विश्वास व्यक्त केला. यावेळी  आदींसह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top