परंडा (प्रतिनिधी)-परंडा विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या तुल्यबळ लढतीत अखेरच्या फेरीत महायुती शिवसेनेचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांचा 1509 मताने पराभव केला आहे. त्यामुळे प्र्रा. तानाजी सावंत यांच्या गटाला विचार करण्याची वेळ आली आहे. 

विशेष म्हणजे प्रा. तानाजी सावंत यांनी पालकमंत्री असताना परंडा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे राबविली. वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात त्यांना यश आले. असे असताना देखील परंडा विधानसभा निवडणूक यंदा वादळी ठरली. या मतदारसंघातील एकूण 27 फेऱ्या झाल्या. मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून अखेरच्या 27 व्या फेरीपर्यंत सावंत गट बेचैन होता. सावंत की मोटे असा मोठ्या चुरशीचा अटीतटीचा सामना सुरू होता. प्रत्येक फेरीत कधी सावंत यांना लीड मिळत तर कधी मोटे यांना लीड मिळत. त्यामुळे परंडा मतदार संघातील आमदारकीचा आखाडा तापला होता. अखेर शेवटच्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे प्रा. तानाजी सावंत यांनी मोटे यांना 1509 मताने चितपट करीत निसटता विजय मिळविला. अन्‌‍ रंगतदार लढतीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

 
Top