तुळजापूर (प्रतिनिधी) -  महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत नरकचतुर्थी अश्विनी अमावस्या  गुरुवार दि. 31 ऑक्टोबर रोजी राञी 8.30 वाजता भेंडोळी उत्सव आई राजा  उदो उदो... सदा नंदीचा उदो उदो... काळभैरव, टोळभैरवाच्या गजरात, संभळाच्या कडकडाटात पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अश्विनी अमावस्येस सांयकाळी काळभैरवाची पुजा करण्यात आली. नंतर कालभैरव मंदिरातून सायंकाळी पोताने भेडोंळी प्रज्वलित करण्यात आले  शेकडो युवकांनी ही भेडोंळी खांद्यावर घेवुन संभळाच्या कडकडाटात काळभैरव, टोळभैरवाचा चांगभलं ... या गजराने आगीची ज्वाळाची लोळ असलेली भेंडोळी  खांद्यावर घेतली. त्यानंतर उतरत्या पायऱ्या वरुन महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजी मठासमोर येताच येथे महंतांनी या भेंडीळीवर तेल ओतुन पुजन केले. नंतर 

ही भेंडोळी महंत तुकोजी बुवा मठा समोर असणाऱ्या सवा फुट वळण बोळातून शिवाजी दरवाजा मार्गे आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात नेण्यात आली. तिथे यावेळी दशावतार मठाचे महंत मावजीनाथ बाबा यांच्या हस्ते या भेंडोळीस तेल अर्पण करुन पुजन करण्यात आले. नंतर ही भेंडोळी पितळी दरवाजातुन देविजींच्या सिंह गाभाऱ्यात नेवुन तिथे प्रदक्षणा मारुन, भवानी शंकर मंडपातुन बाहेर येवुन मंदीर प्रांगणात प्रदक्षणानंतर निंबाळकर दरवाजा, राजे शहाजी महाव्दार मधुन 

रस्त्यावरुन ती वेशी बाहेर नेण्यात आली. येथे डुल्या मारुती मंदीराच्या पारावर अहिल्यादेवी होळकर विहीरीतील जलाने ही भेंडोळी शांत (विझवली) केली गेली. शहरातील युवक व मानकरी ही ज्वाळा स्वतःच्या खांद्यावर वाहन घेवून जातात. हा अनोखा भेंडोळी उत्सव देशातील केवळ दोन तीर्थक्षेत्रात साजरा केला जातो. एक म्हणजे तीर्थक्षेत्र काशी येथे फुलांची आणी दुसरे तुळजापुरात आगीच्या ज्वालाची भेंडोळी अश्विन अमावस्था दिनी काढली जाते. भेंडोळी उत्सवाचा थरार पाहण्यासाठी भेंडोळी मार्गावर भाविक, नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती.

 
Top