उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा व लोहारा तालुक्याच्या विकासासाठी ज्ञानराज चौगुले  चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. सर्वसमान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आ. ज्ञानराज चौगुले यांना विजयी करा, विधानसभेत पुन्हा आ. ज्ञानराज चौगुले यांचा आवाज घुमवूया, असे आवाहन माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर आर.पी. आय.चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ, माजी सभापती दिलीप गौतम, माजी सरपंच विलास व्हटकर, प्रा शौकत पटेल, माजी सभापती हरीश डावरे,सरपंचपती अप्पू गुंजोटे ,उपसरपंच बाबा गायकवाड,चेअरमन बाबासाहेब श्रीहास उटगे, सोमशंकर पाटील, धनराज पाटील, विजयकुमार सोनकटाळे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ  येणेगुर येथे शुक्रवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र  विरशैव सभा पुणे यांनी यावेळी आमदार  ज्ञानराज चौगुले यांना पाठिंबा दिला. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे.देशात व राज्यात महायुतीची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी मतदारसंघातील आमदार ही महायुतीचाच पाहिजे. राज्यात कोणीही उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन आम्ही देत आहोत. वृद्ध पेन्शनदार कामना योजना 1500  वरून 2100 रुपये देण्याचे वचन  देणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत मंगरुळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बिराजदार, राष्ट्रवादीचे युवा नेते अप्पू हिप्परगे , भाजपा तालुका सरचिटणीस सागर पाटील, भाजपा नेते मताफ तांबोळी, शेखर दादा स्वामी, तूगावचे संजय बिराजदार, दीपक जोमदे, महादेव बिराजदार, अशोक माळी, आकाश राजे कांबळे, प्रभाकर येडगे, दिलीप येडगे, पिंटू नाटेकरी, बालाजी धामशेट्टी, महेश बिराजदार, शेखर पोफळे, शेषेराव पाटील ,नागेश पाटील, दत्ता हूळमुजगे आदींसह गावातील नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top