उमरगा (प्रतिनिधी)- महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना, कृषीपंपाचे वीज बिल 100% माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतले आहे. तसेच महिला, विद्यार्थी, शेतकरी, तरुण, कामगार, नवद्योजक अशा समाजातील सर्व घटकांसाठी नवनवीन आणि उपयोगी योजना आणल्या आहेत. याचा फायदा राज्यातील नागरिकांना होत आहे. राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्यासाठी व मतदारसंघाचा विकासाचा चढता ठेवण्यासाठी चौगुले यांना हजारो मतांच्या लीडने निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी बलसुर ( ता. उमरगा ) येथील जाहीर सभेत  शनिवारी  केले.

उमरगा-लोहारा विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचरार्थ आयोजित बलसुर येथील प्रचारासाठी दत्त  मंदिर समोरील पटांगणात जाहीर सभेत  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती जितेंद्र शिंदे, माजी सभापती हरीश डावरे, माजी सभापती दिलीप गौतम, राष्ट्रवादी  तालुका अध्यक्ष सुनील साळुंके, लहुजी शक्ती सेना प्रदेश सचिव दिलीप गायकवाड, तालुकाध्यक्ष लहुजी शक्ती सेना विजय तोरडकर, अभिजीत देडे, प्रा. शौकत पटेल, माजी सरपंच विलास व्हटकर, उपसरपंच आयुब पटेल,सत्यनारायण जाधव, बब्रुवान चव्हाण, प्रताप महाराज मोहिते आदी मान्यवराचे प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार चौगुले यांनी सांगितले की, महायुतीचं सरकार आल्यानंतर 45 हजार गावात पांदण रस्ते बांधणार.अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रुपये आणि विमा सुरक्षाकवच देण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार आहोत.

याप्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शमशोदिन जमादार, सुरेश वाकडे ,सकलेन बंडगीरे,तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील, वायबर सरवदे, दत्तू बनसोडे, दत्तू चव्हाण, चंद्रकांत भोसले ,माधव नांगरे, वसंत साखरे, संभाजी साखरे, इंद्रजीत घोडके, बिराजदार ,किशोर बिराजदार देवा चव्हाण, राहुल चव्हाण, राहुल राठोड ,कलेश्वर राठोड, हरिदास चव्हाण, प्रेमदास चव्हाण, सचिन पवार, अतिश राठोड, सुरज चव्हाण, कपिल चव्हाण ,अजित चव्हाण, नितीन चव्हाण, अप्पासाहेब चव्हाण आदींसह गावातील नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top