धाराशिव (प्रतिनिधी)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत असलेल्या माध्यम कक्षाला दि. 8 नोव्हेंबर रोजी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (सामान्य) गोपाल चंद यांनी भेट दिली.

माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी चंद यांचे स्वागत करून माध्यम कक्षाच्या आणि या कक्षाअंतर्गत कार्यरत असलेल्या माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी संतोष भोर प्रामुख्याने उपस्थित होते. माध्यम कक्षात लावण्यात आलेल्या टीव्हीच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्यांमध्ये जिल्ह्यातील प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर देखरेख करण्यात येत असल्याचे सांगून खडसे माहिती देतांना म्हणाले. बातम्यांची नोंद घेऊन दखलपात्र वृत्त वरिष्ठांच्या लक्षात आणून देण्यात येते. 

प्रत्येक उमेदवारांच्या समाज माध्यम खात्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे.आक्षेपार्ह पोस्ट कोणी टाकत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करावी.तसेच उमेदवारांचा समाज माध्यमांवर होणारा खर्च याबाबतची माहिती खर्च संनियंत्रण कक्षाला वेळीच देण्यात यावी. असे चंद यांनी यावेळी निर्देश दिले. वृत्तपत्रातील येणाऱ्या बातम्या उमेदवारांच्या पेडन्यूज आहे का याची शहानिशा माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समितीने करावी. प्रत्येक उमेदवारांच्या वृत्तपत्रात, वृत्त वाहिन्या व समाज माध्यमात येणाऱ्या  बातम्यांवर समितीने लक्ष ठेवावे. उमेदवारांच्या प्रचारविषयक साहित्याचे परवानगी देताना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करावी. यावेळी माध्यम कक्षाचे प्रा.बी.एस उडचण, प्रा.संतोष भांडेकर, सहकार अधिकारी अमोल सोलणकर, परीविक्षा अधिकारी अरविंद थोरात, व्यंकट देवकर, अतुल कुलकर्णी, नंदू पवार, ए.एस.कस्तुरे, शिक्षक सुनील माळी, संदीप उंडे, विनोद जानराव, प्रमोद राऊत, कविता राठोड, श्रीमती चित्रा घोडके, शैलेश खारगे, अनील वाघमारे व श्रीकांत देशमुख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 
Top