तेर (प्रतिनिधी)- वै.हभप चैतन्य सदगुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज वारकरी पुरस्कार हभप श्रीगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना प्रदान करण्यात आला.
श्री संत गोरोबा काका व चैतन्य सदगुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज प्रतिष्ठान श्री क्षेत्र वाणेवाडी ता.धाराशिव, श्री संत सेवा संघ सातारा व श्री ज्ञानराज प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वै.हभप चैतन्य सदगुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज वारकरी दरवर्षी पुरस्कार दिला जातो.हा पुरस्कार हभप श्रीगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना हभप श्रीगुरू विठ्ठल महाराज वासकर (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली व हभप गुरूवर्य श्री पांडुरंग महाराज घुले (देहू ) यांच्या हस्ते पंढरपूर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी हभप शंकर महाराज बडवे, हभप प्रभाकर महाराज बोधले, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी अशीर्वचन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवणसिद्ध लामतुरे यांनी केले.यावेळी पांडुरंग उंबरे, महादेव गाढवे, शेषराव पौळ, रामचंद्र उंबरे, भागवत घेवारे, शशिकांत काटे, अक्षय भोसले, सोनोपंत घाडगे,मदन कदम, श्रीपती माने व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.