तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील वैष्णवी माने हीची राष्ट्रीय वेटलिप्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.         

बालेवाडी, पुणे येथे राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा  पार पडल्या .यामध्ये महाराष्ट्र संत विद्यालयातील वैष्णवी नारायण माने हिने 81 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून दिल्ली येथे होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड  झाली आहे.वैष्ववी माने हीला अजिंक्य वराळे व योगेश माने यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल वैष्णवी माने हिचे महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे यांनी अभिनंदन केले.

 
Top