तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद  कन्या प्राथमिक शाळेत पालक सभा  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासाहेब मगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.                                                      

शाळेच्या मुख्याध्यापिका  सुरेखा कदम  यांनी प्रास्ताविकातून 100% उपस्थिती व गुणवत्ता विकास  करण्यासाठी पालकांचा सक्रीय  सहभाग अपेक्षित आहे असे पालकांना आवाहन केले.प्रथम सत्र परीक्षा व निकाल  याबाबत सहशिक्षक मालोजी वाघमारे यांनी चर्चा केली. सहशिक्षक सुशील क्षीरसागर यांनी शाळेच्या शैक्षणिक सहलीचा प्रस्ताव मांडला व सहलीचे नियोजन सांगितले. सहशिक्षक काशिनाथ नरसाळे यांनी उपस्थित पालकांचे आभार  मानले.यावेळी शाळा व्यवस्थापन  समितीच्या उपाध्यक्षा.वर्षा फासे,शालू वतारी,.नारायण  साळुंके व पालक उपस्थित होते. शाळेतील प्रतिभा जोगदंड,  पल्लवी पवार,  ज्योती गाढवे,किरण फंड  यांच्या सक्रीय सहभागाने पालक  सभा संपन्न  झाली.

 
Top