धाराशिव (प्रतिनिधी)- दि १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर हा जागतिक वारसा सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो. धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील अनेक वारसा स्थळे असून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पर्यटन जनजागृती संस्था संचलित जिल्हा पर्यटन विकास समिती व पुरातत्त्व विभाग सातत्याने कार्य करत असते. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.
यावेळेस देखील जागतिक वारसा सप्ताह च्या निमित्ताने पर्यटन जनजागृती संस्था व पुरातत्त्व विभागाच्या वतीने धाराशिव शहरात असलेल्या परंतु दुर्लक्षित असलेल्या चामर लेणी येथे व तेथून जवळच असलेल्या गढी येथे दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले आहे. तरी इतिहास, पर्यटन व पुरातत्त्व प्रेमींनी या हेरिटेज वॉक मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पर्यटन जनजागृती संस्थेचे अध्यक्ष युवराज नळे, पुरातत्त्व विभाग छत्रपती संभाजी नगर च्या सहाय्यक संचालक जया विलास वाहणे व संस्थेच्या सर्व सहका-यांनी केले आहे.