धाराशिव (प्रतिनिधी)- दिल्ली येथे संसदेच्या ग्रामीण विकास व पंचायतराज समितीची बैठक पार पडली. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जलजिवन योजना व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा संदर्भातील जळजळीत वास्तव ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या ग्रामविकास व पंचायत राज समितीच्या बैठकीसंदर्भात निदर्शनास आणुन दिले. यावेळी ग्रामीण भागातील घरकुलांना शहराप्रमाणे 2 लाख 40 हजार रुपये द्यावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
या बैठकीत प्रामुख्याने सविस्तर सूचना मांडल्या ग्रामीण भागात पूर्वी जलस्वराज, भारत निर्माण राष्ट्रीय पेय जल ,जल जीवन मिशन अशा पाणीपुरवठ्याच्या योजना झाल्या. त्या पाहता त्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊन देखील त्या बंद अवस्थेत उभा केल्यासारखं दिसत आहेत. या सर्व योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले असल्याने ग्रामीण भागातील जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे अशा पाणी पुरवठा योजनेतील विहीर व पाण्याची खात्री झाल्यानंतर उर्वरित कामे करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक वेळा पाणीपुरवठा, विहिरीच्या पाण्याची खात्री न करता उर्वरित कामे करून मोठ्या प्रमाणात शासनाच्या पैशाचा अपव्यय केला जातो. अशा आरोपही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत केला.
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेली 7 वर्षापासून होत नसून यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी या स्थानिक स्वराज्य संस्थेत नसल्याने त्यांना मिळणारा निधी हा विविध विकास कामाचा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विकास कामे होण्यास मदत होते. मात्र अशा निवडणुका नसल्याने हा निधी महाराष्ट्राला मिळत नाही. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परीषदेच्या निवडणुका देखील तात्काळ घ्याव्यात अशी सूचना देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत केली.