तुळजापूर (प्रतिनिधी)- मंगरूळ येथेही जाहीर सभेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड. धिरज पाटील यांनी जाहीर सभा घेऊन चालू आमदारांवर निशाणा साधत म्हंटले की, खोटी आश्वासने देऊन नुसती उद्घाटने करत जनतेची दिशाभूल करणारे आमदार महाशय आहेत. अशी टिका ॲड. पाटील यांनी केली.
त्याच्याच पध्दतीने महायुती सरकार ही खोटी आश्वासने देत आहेत. सध्या पीककर्ज घेतलेल्या व थकीत शेतकऱ्यांना बँका दमदाटी करून धमकावत आहेत. त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करत आहेत. हे खपऊन घेतले जाणार नाही. म्हणून येत्या 20 तारखेला मशीनवरील एक नंबर क्रमांकावरील हाताच्या चिंन्हा समोरील बटन दाबुन प्रचंड मतानी विजयी करावे.
या वेळी जेष्ठ नेते मुकुंद डोंगरे, डॉ. जितेंद्र कानडे, ऋषी मगर, कमलाकर चव्हाण, संजय धुरगुडे सह मान्यवरांची भाषणे झाली. या वेळी विजय सरडे, ढवळे वकील, आनंद उपासे, विजय डोंगरे, रसीक वाले, आप्पा डोंगरे, पुरूषोत्तम देशमुख, सुनील जाधव, मनोज डोंगरे, गिरीश डोंगरे, विरेश डोंगरे आदी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.