तुळजापूर (प्रतिनिधी)- आरळी, खुर्द. ता. तुळजापूर येथे काँग्रेस आय पक्षाचे आणि महाविकास आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचार निमित्त धीरज यांच्या मातोश्री व तसेच पत्नी डॉ. शुभांगी धीरज पाटील यांच्या हस्ते हळदी कुंकू आणि प्रचार करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य ऊर्मिलाताई जाधव, तसेच भोसले ताई आणि त्यांच्या इतर सहकारी तसेच आरळी खुर्दचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष सोमवंशी, विकास वाघमारे, सिद्राम दरेकर, सेनेचे महादेव गायकवाड, राष्ट्रवादीचे सुभाष पारवे, समस्त ग्रामस्थ, महिला कार्यकर्ते राणी संतोष सोमवंशी, सुवर्णा सोमवंशी, शामल दरेकर, मिनाक्षी नन्नवरे, सीधू नन्नवरे, निर्मला कोठावळे, वनिता दरेकर , कस्तुर कुंभार, प्रिया मोहिते आणि इतर ग्रामस्थ मंडळी आरळी खुर्द यांनी त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक संतोष सोमवंशी यांनी केले. तर आभार सुभाष पारवे यांनी मानले.