धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील ॲथलेटिक्स कोचिंग सेंटर चे विभागीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत दबदबा कायम आहे.5 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिस कवायत मैदान नांदेड येथे झालेल्या लातूर विभागीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केले.
त्यामध्ये 14 वर्षांखालील गटात विश्वजित मेंगळे उंच उडी प्रथम, दुर्गेश जाधव 100 मी धावणे तृतीय, 17 वर्षाखालील गटात सागर काकडे 800 मी धावणे प्रथम व क्रॉसकंट्री सातवा,सोमनाथ ससाणेउंच उडी व्दितीय, दीपक काकडे-लांब उडी तृतीय तसेच 19 वर्षाखालील गटात विराज जाधवर 800 मी, 1500 मी धावणे व क्रॉसकंट्री मध्ये प्रथम, करण बिक्कड 5 किमी चालणे प्रथम, धीरज रायबाण 400 मी हर्डल्स प्रथम, तसेच 4 x 400 मी रिले मध्ये व्दितीय क्रमांक पटकावला. त्यांची शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी जिल्हा पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तर शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक योगेश थोरबोले यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप, तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, अक्षय बिरादार, डिम्पल ठाकरे, तालुका संयोजक बिभीषण पाटील, अजिंक्य वराळे, राहुल जाधव, ज्ञानेश्वर भुतेकर, राजेश भवाळ, नागेश राजुरे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.