धाराशिव (प्रतिनिधी) -  लातूर विभागीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत सारोळा येथील शारदा विद्यानिकेत शाळेचे घवघवीत यश संपादन केले आहे. 5 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिस कवायत मैदान नांदेड येथे झालेल्या लातूर विभागीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेतील क्रॉसकंट्री (4 किमी धावणे) या क्रीडा प्रकारात साक्षी दिनकर आगाशे या खेळाडूने सहभाग घेऊन चौथा क्रमांक पटकावला. तिची डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तर शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल खेळाडू व तिचे प्रशिक्षक तुलसीदास पिसे, जयंत बाकले, योगेश थोरबोले यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश देवगिरी, सचिव शशिकांत रणदिवे, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व संस्थेचे सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top