तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील अपसिंगा गावात महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर व पदाधिकारी प्रचार दौऱ्यासाठी अपसिंगा गावात गेले. संपूर्ण गावाने त्यांचे स्वागत करून धिरज पाटील यांना संपूर्ण ग्रामस्थातर्फे 11 हजार रुपये निवडणूक प्रचारासाठी मदत म्हणून गावातर्फे पैसे सुपुर्द केले.

यांच्या या दानशूर पणाची चर्चा सर्व तालुक्यासह जिल्ह्यात पसरली असुन लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी तुळजापूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी या मदतीचा निश्चितपणे उपयोग होईल अशी चर्चा महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत. तसेच या देणगीबद्दल अँड. धिरज पाटील यांनी सर्व ग्रामस्थाचे आभार मानले. यावेळी माणिकराव पाटील, सिध्दीकुमार कदम, दिपक देशमुख सरपंच कात्री, जब्बार काझी, गौतम सोनवणे, दिपक देशमुख, संतोश सबरे, अमोल तोडकरी, दिपक सोनवने, बालाजी पांचाळ, भैरवनाथ गोरे, नरसिंह पाटील, गोपाळ गोरे, शीतल गोरे, माणिक पाटील सह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top