परंडा (प्रतिनिधी) -डी.बी ए.समूह परंडा व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल यांच्या संयुक्त संघटनेच्या वतीने गुरुवार दि.28 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी येथील शासकीय विश्रामगृह येथे साजरी करण्यात आली.
यावेळी डी.बी.ए.समुह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, ॲड.दयानंद धेडे ,पोलीस पाटील दिलीप परिहार खानापूर , युवा नेते शंकर लांडगे वाटेफळ,तालुका अध्यक्ष अतुल सोनवणे,अध्यक्ष बापू शिंदे, रवी बनसोडे, तसेच महिला आघाडीच्या अध्यक्ष गायकवाड मॅडम, तसेच ताई चालणे विजयाबाई बनसोडे,सिराज पठाण, नितीन शिंदे,जितेंद्र जाधव, अरुण बनसोडे, मोहन जगताप,एकबाल मुलांनी, बापू शिंदे,आदी कार्यकर्ते महिला मोठया संख्येने उपस्थित होते.