धाराशिव (प्रतिनिधी)-  क्रेडीट कार्ड ॲक्टीवेट करण्याचे निमित्त सांगून धाराशिव येथील एका युवकाच्या खात्यातून 4 लाख 49 हजार 252 रूपये ऑनलाईन लंपास केले. सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत ही रक्कम युवकाला परत करण्याची कामगिरी केली.

धाराशिव येथील सुलतान अझहर पटेल, वय 26 वर्षे, त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने फोन करुन तो आयसीआयसीआय या बॅकेतुन बोलत असल्याचे सांगितले. क्रेडीट कार्ड ॲक्टीवेट करण्यासाठी मोबाईलवर ओटीपी येईल असे सांगून तक्रारदार यांचे कडून तीनवेळा ओटीपी घेतला. त्यावेळी तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्डवर अनुक्रमे 96 हजार 92, 88 हजार 290 व 2 लाख 64 हजार 870 रूपये असे तीन ट्रान्झक्शन झाल्याचे मेसेज आले. तक्रारदार यांनी सदर इसमास पैसे कट झालेबाबत विचारणा केली असता त्याने उडवाडवीची उत्तरे दिली. तक्रारदार यांना संशय आल्याने ते तात्काळ सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे आले. सायबर पोलीसांनी तात्काळ तक्रारदार यांची ऑनलाईन तक्रार नोंदवून तांत्रिक विश्लेषण केले. तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्डद्वारे ॲमेझॉनवर खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ ॲमेझॉन कंपनीला इमेल करुन नोडल अधिकारी यांचेशी संपूर्क करुन यातील तक्रारदाराच्या क्रेडीट कार्डवर केलेली खरेदीचा ऑर्डर रद्द करुन तक्रारदार यांची गेलेली संपुर्ण रक्कम 4 लाख 49 हजार 252 परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.

सदरची  कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, पोलीस हावलदार हालसे, नाईकवाडी, महिला पोलीस नाईक पौळ, पोलीस अमंलदार जाधवर,भोसले, मोरे, भोसले, तिळगुळे, कदम, काझी, सुर्यवंशी, महिला पोलीस अमंलदार खांडेकर, शेख  यांच्या पथकाने केली आहे.


 
Top