तुळजापूर (प्रतिनिधी) - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गंगणे  हे क्राक्रंबा गावामध्ये गेले असता क्रांक्रबा गावामधील श्री खंडोबा मंदिर समितीचे अध्यक्ष शाम निवृती ढेरे यांनी मंदिर समितीच्या वतीने विजय गंगणे यांना मंदिराकरीता देणगी मागितली होती.

सदर देणगी मागीतली असता विजय गंगणे यांनी त्यांना राणादादा विजयी होवू दे मी देणगी देतो असे सांगितले. आमदार राणाजगजितसिंह पाटील  विजयी होताच  विजय  गंगणे यांनी श्री खंडोबा मंदिरास स्वखुशीने 51 हजार रूपये देणगी दिली. सदरील 51 हजार रुपये देणगी धनादेश  श्री खंडोबा मंदिर समितीचे अध्यक्ष शाम निवृती ढेरे यांच्याकडे विजय गंगणे मित्र परीवार तुळजापूर यांच्या वतीने उद्योजक अनंत रसाळ यांच्या हस्ते  सुपूर्द केला. त्यावेळी श्री खंडोबा मंदिर समितीचे अध्यक्ष शाम निवृती ढेरे, दत्तात्रय बंडगर, काका बंडगर, दरगु खांडेकर, अशोकराव देवगुंडे, नागु कोरे, अमर कोर, अनंत हांडे, हरीदास कोळी

व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top