तुळजापूर (प्रतिनिधी) -  धाराशिव - तुळजापूर महामार्ग रस्त्यावर तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील राजपॅलेस रस्त्यावर लावलेली  गाव दर्शक लोखंडी कमान गंजुन कलल्याने ती धोकादायक अवस्थेत उभी असल्याने ती कमान काढुन टाकण्याची मागणी होती आहे.

तिर्थक्षेञ  तुळजापूरात  प्रवेश करताच हाँटेल राजपँलेस समोरील रस्त्यावर गाव आंतर मंदीर कडे जाणारा मार्ग अशी लिहलेली पन्नास फुट लांब तीस फुट उंच लोखंडी कमान गजल्याने ती कलली आहे. तसेच मध्य भागी दाब आलल्याने ती खचली असुन तिथे दुसरे दोन्ही बाजुला आधारसाठी  लोखंडी लहान अँगल लावले आहेत. हे पण आता गंजु लागले आहे. ही ! लोखंडी कमान महामार्ग रस्त्यावर कलत चालली आहे या महामार्ग रस्त्यावर प्रचंड वाहतुक आहे. ही जर अचानक कोसळली तर भाविक प्रवाशी यांच्या जीवाला धोका होण्याची मोठी शक्यता असल्याने महामार्ग रस्त्यावर धोकादायक बनलेली ही लोखंडी कमान तात्काळ हटवावी. कोसळुन जर दुर्घटना घडुन जिवीत हानी झाली तर संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.


रात्री वाहन धडकेत कमान कोसळण्याची शक्यता !

विशेष म्हणजे राञी येथे अंधार असल्याने वाहन चालकांना व्यवस्थित कमान दिसत नसल्याने अनेक वाहने याला धडकले आहेत धडकेमुळे ही कमान कोसळण्याची शक्यता आहे.


 
Top