तुळजापूर (प्रतिनिधी) -  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभरातील नेत्यांच्या बॅगांची आणि गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. केद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी गुरुवार  दि. 14 नोव्हेंबर रोजी  तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे हेलिकॉप्टरने प्रचारासाठी आले असता निवडणुक विभागाचा अधिकारी कर्मचारी नी  हेलिक़ॉप्टर मधील  बॅगांची पिशवी बास्केट ची  तपासणी  केली यात त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. या वेळी  एका ंबँगेत कागदपत्रे, एका बास्केट मध्ये औषधे व ड्राँयफुड आढळले.

ज्या प्रकारे आमच्या बॅगा तपासल्या जात आहेत. त्याप्रमाणेच मोदी, फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या देखील बॅगांची तपासणी करा, अशी तंबी  उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकँप्टर मधील बँगाची तपासणी झाल्याची चर्चा होत आहे. या तपासणी बाबतीत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे म्हणाले की आर्दश आचार संहिता पालन करीत निपष्पक्षपणे आम्ही ही कारवाई केली असल्याचे यावेळी म्हणाले.


 
Top