धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपा महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजारावरून एकवीसशे होणार आहे. मुलींना मोफत शिक्षण, एसटी बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास, लखपती दीदी योजना, मोफत गॅस सिलेंडर, घरकुल योजना आणून सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. या सरकारला बळ देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी मतदारांनी उभे रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी केले.
भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ गवळेवाडी, केमवाडी, गंजेवाडी येथे कॉर्नर बैठका, सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा खास करून महिलांचा लाभणारा प्रतिसाद हा आत्मविशास वाढवणारा आहे. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. खासकरून महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेले प्रकल्प अंतिम टप्यात आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधून आपण या गावांसाठी भरपूर विकासनिधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार हमी कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार हमी कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना व्यवसाय उभारणीसाठी मदत केली आहे. हा विकासाचा ओघ कायम ठेवण्यासाठी आपल्या आपल्या हक्काचे राणादादा आणि महायुती सरकार येणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच महायुतीला भरभरून समर्थन द्यावे, असे आवाहन केले.