तुळजापूर (प्रतिनिधी)- 241 तुळजार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत द्वितीय प्रशिक्षणास विनापरवानगी व अनाधिकृतपणे गैरहजर राहिले. प्रकरणी 36 गुरुजींना कारणे दाखवा नोटीस बजावुन आपले म्हणने 24 तासाचा आत सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी दिला आहे. या प्रशिक्षणासाठी एकुण 1859 कर्मचाऱ्यांचे आदेश प्राप्त होते. त्यापैकी 1823 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. मात्र 36 जण गैरहजर होते. त्यामुळे 36 गैरहजर असणाऱ्या गुरुजींना गुन्हा का दाखल करण्यास येऊ नये? याचा खुलासा घेण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या.
कारणे दाखवा नोटीसीत म्हटले आहे कि, 241- तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून, सदर मतदानाची प्रक्रिया सुरळीत व कालमर्यादेत पार पाडणे आपली मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती आदेश या कार्यालयाद्वारे निर्गमीत करण्यात आला होता. तथापी 12 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचेसाठी द्वितीय प्रशिक्षण श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणेकरीता सदर आदेशाद्वारे कळविण्यात आले होते.
असे 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे. या नोटीसींची प्रत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, धाराशिव यांना माहितीस्तव सादर करण्यात आली आहे.