उमरगा (प्रतिनिधी)- महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली आणि महाविकास आघाडीच्या पोटात दुखू लागले. ते आमच्या विरोधात कोर्टात गेले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडचा घास पळविण्याचे काम महाविकास आघाडी करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी उमरगा येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या सभेत ते म्हणाले, आमच्या सरकारने आणलेल्या योजनाच त्यांनी ढापल्या आहेत. एकीकडे आम्ही आणलेल्या योजनांना विरोध करायचा, दुसरीकडे आमच्या योजना स्वतःच ढापायच्या, असा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हीच मंडळी न्यायालयात गेली होती. आता नाव बदलून ते ही योजना देऊ पहात आहेत.ते फेक नरेटिव्ह पसरवणारे आहेत. आमचे सरकार प्रिंटिंग मिस्टेक वालेनाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी सभापती जितेंद्र शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ.चंद्रकांत महाजन, माजी जि.प. सभापती  अभय चालुक्य, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड,भाजपा तालुकाध्यक्ष शाहजी पाटील ,भाजपा जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष श्रीकांत मणियार, भाजपाचे दिलीप गौतम, माजी सभापती हरीश डावरे,  शेतकरी सेना विलास भगत ,संतोष सगर ,माजी सभापती मदन पाटील,सुभाष सोनकांबळे , सुधाकर महाराज, माधव पवार ,राहुल पाटील, अरुण इगवे,सुशिल दळगडे,दत्ता पाटील, युवराज जाधव, बाळासाहेब किस्से, ॲड.वैजीनाथ आडसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, सिद्रामप्पा चिंचोळे, प्रा.शौकत पटेल, सचिन जाधव, आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. शेतकरी, गरिबांच्या वेदनांची जाणीव मला आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार? कल्याणकारी योजनांना विरोध करणारी ही मंडळी त्यांचे सरकार सत्तेत आल्यास आम्हाला जेलमध्ये टाकू असे म्हणत आहेत. शेतकरी बहिणींसाठी दहा वेळासुद्धा जेलमध्ये जायला आम्ही तयार आहोत. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, विकासाच्या मारेकऱ्यांना कायम घरी बसवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गुंजोटीचे माजी सरपंच विलास व्हटकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख उबाठा तथा पंचायत समिती सदस्य उमरगा, माजी पंचायत समिती सदस्य उमरगा विष्णू पाटील, उपसरपंच आलूर जितेंद्र पोतदार, विभाग प्रमुख उबाठा महादेव म्हात्रे बलसुर, माजी सरपंच जेकेकुर दत्ता पाटील, आकाश राजे कांबळे लहुजी शक्ती सेना तालुका संघटक बळीराम मोरे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top