तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे विजेचा खेळखंडोबा सुरूच असुन गुरुवारी सकाळी अचानक कमी दाबाने वीज पुरवठा होवु लागल्याने यात विज इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होवुन विद्युत ग्राहकांना याचा मोठ्या प्रमाणात अर्थिक फटका बसला आहे.
चिमणीच्या उजेडा ऐवड्या दाबाने गुरुवार सकाळी वीज पुरवठा झाल्याने नागरिक चांगलेच वैतागून गेले होते. वीज वितरणचा बोजावरा उडाल्याने कमी जास्त दाबाने वीज तसे इलेक्ट्रिक उपकरणे खराब होत असल्याने नाग शहरवासीय महावितरण चा भोंगळ कारभाराला चांगलेच वैतागुन गेले आहे.
लोकशाही उत्सव चालु असतानाही विज ये जा करणे चालुच होते. मतदान काळात ही वीज येजा करणे सुरुच होते.
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात विजेचा खेळखंडोबा गेली अनेक महिन्या पासुन सुरु आहे. पुर्वी पाऊस येताच हमखास विज गायब होते. आता तर चक्क पाऊस वादळवारे नसताना विज गायब होत आहे. या विजेच्या जाण्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सातत्याने वीज ये-जा करीत असल्याने याचा फटका अनेकांचे विद्युत इलेक्ट्रॉनिक उपकारणांनमध्ये बिघाड होवुन बसला आहे. तसेच शहराचा पाणी वितरणावर ही याचा मोठा परिणाम होत आहे.
आता कृषीसाठी विजेची मागणी नसतानाही वीज गायब होणे, ये-जा करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. तुळजापूर येथील विद्युत कारभारावर कुण्याही कारभा-यांची लक्ष दिसत नाही. सध्या फक्त विद्युत अधिकारी वर्गाचे फक्त ठेक्यावर लक्ष असल्याची चर्चा वीज ग्राहकां मधुन केली जात आहे. दिवसा-राञी वीज कधी जात कधीही वीज पुरवठा गायब होत असल्याने दर्शनार्थ जा-ये करणाऱ्या भाविकांमध्ये वीज गायब होताच असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे. वीज जाण्याचा फटका खरेदी करणारा भाविक खरेदी न करता गावी परतत आहे. कमीत कमी होत असलेल्या गर्दी पार्श्वभूमीवर तर अखंडीत पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्याची मागणी होत आहे.