धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील हिंदी विभागांमध्ये पीएच.डीचे संशोधन करत असणारी तृप्ती सोनवणे यांची पीएच.डी पूर्व तोंडी परीक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
तृप्ती सोनवणे यांचा संशोधनाचा विषय 21 वी सदी के प्रथम दशक के हिंदी कहानी मे स्त्री विमर्श हा होता. पूर्व तोंडी परीक्षेसाठी विषय तज्ञ म्हणून प्रा .डॉ. हाशमबेग मिर्झा हे होते. तर मार्गदर्शक डॉ. दत्ता साकोळे हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. विनोदकुमार वायचळ हे होते.
तृप्ती सोनवणे यांनी आपल्या संशोधनाविषयी उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी यांच्यासमोर सादरीकरण केले. यावेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्याकडून संशोधनाविषयी प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांचे समाधान तृप्ती सोनवणे यांच्याकडून करण्यात आले. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. केशव क्षीरसागर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.विनोदकुमार वायचळ यांनी केले. तर आभार डॉ. दत्ता साकोळे यांनी मानले. सदर परीक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.