तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळी बुद्रुक शिवछत्रपती क्रिडा संकुल येथील श्रीमंत आखाड्यात सोमवार 2 डिसेंबर रोजी राज्यभरातील निमंत्रित मातीतील कुस्तीविरांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.
माऊली बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधत आरळी बुद्रुक आणि परिसरातील कुस्ती शौकीनांसाठी विशेष भव्य मैदानी कुस्ती दंगल आयोजित केलेली आहे. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आरळी बुद्रुक गावात मर्दानी कुस्ती खेळ प्रकाराला अनेक वर्षांपासून प्रोत्साहन देण्यात येत आहे,गावातील मल्ल अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होत आले आहेत. मातीतील कुस्ती सातत्याने आरळी गावच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. धाराशिव जिल्हयासह सोलापूर,लातूर जिल्ह्यातुन प्रतिवर्षी मल्ल कुस्तीसाठी येत असतात. यंदा प्रथमच निमंत्रित मल्लांच्या कुस्त्यांची दंगल कुस्ती शौकिनांना पहायला मिळणार आहे. कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातील मल्ल यावेळी सहभागी असणार आहेत.सर्व विजेत्यांना रोख बक्षीसांसह सन्मानित करण्यात येणार आहे. कुस्तीची दंगल पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माऊली बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहायक फौजदार संजय पारवे यांनी केले आहे.
आरळी बुद्रुक येथे ग्रामीण तरुणांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिवछत्रपती क्रिडा संकुल येथील माऊली सामाजिक संस्थेचे माध्यमातून सहा एकर जमीनीवर मातीतील कुस्ती आखाडा,नियोजित मॅट कुस्ती आखाडा,क्रिकेट ग्राऊंड,रनिंग ट्रक,ओपन जिम,दोन खोखो,कबड्डी, हॉलीबॉल मैदानाची निर्माण प्रक्रिया सुरू आहे. आजमितीला श्रीमंत कुस्ती आखाड्यात निवासी 30 मल्ल सराव करत आहेत. या मल्लांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या नामांकित कुस्तीगिरांची दंगल आयोजित केली आहे.
संजय रमेश पारवे - अध्यक्ष