धाराशिव (प्रतिनिधी)- विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक 5 व 6 नोव्हेंबर 2024 रोजी पोलीस ग्राउंड नांदेड येथे 14/17/19 वर्षाखालील मुला मुलींची पार पडल्या या स्पर्धेमध्ये आपल्या एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून यश संपादन केले. त्यामध्ये 80 मी हर्डल्स करण पवार - तृतीय क्रमांक, 5 किमी चालणे मंगेश झोडपे द्वितीय क्रमांक, 400 मी हर्डल्स अश्विनी चव्हाण प्रथम क्रमांक, मनीषा राठोड द्वितीय क्रमांक, क्रॉस कंट्री 6 किमी धावणे ज्योतीराम पवार सहवा क्रमांक असे क्रमांक मिळाऊन यश संपादन केले. प्रथम व द्वितीय क्रमांक असणाऱ्या मुलींचे पुढे रत्नागिरी डेरवण येथे होणाऱ्या व मुलांची पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे
सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर यांचे संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्यवाह विवेक अयाचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.