उमरगा (प्रतिनिधी)- सर्वधर्मसमभाव असणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून द्या असे आवाहन काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी उमरगा मध्ये केले. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा), काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण स्वामी यांच्या प्रचारार्थ गुरूवारी दि. 7 नोव्हेंबर रोजी शहरातील शिवाजी चौकात जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे अध्यक्षस्थानी होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण स्वामी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, विजयकुमार सोनवणे, महेश देशमुख, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, बाबुराव शहापुरे, रझाक अत्तार, राजु तोडकर, ॲड. शुभदा पोतदार, ॲड. शितल चव्हाण, संजय पवार, नानाराव भोसले, ॲड. सयाजी शिंदे, अर्जुन बिराजदार, बलभिम पाटील, अभिषेक औरादे उपस्थित होते.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडक्या बहीणींसाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातुन तीन हजार रुपये दिले जातील. महीला व मुलींसाठी मोफत प्रवास, अडीच लाखाचा आरोग्य विमा, तीन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी. मुलींसोबतच मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. उच्चशिक्षीत, सामाजीक भान असणारे व शिक्षणाचा लाऊडस्पिकर पॅटर्न राबविणाऱ्या आदर्श शिक्षकाला निवडून दया. असे मत काँग्रेस पक्षाचे माजीमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.
खासदार ओमराजे निंबाळकर, बाबा पाटील, अष्लेष मोरे, ॲड. शितल चव्हाण, अविनाश रेणके, ॲड. सयाजी शिंदे, सुधाकर पाटील यांची यावेळी भाषणे झाली. मधुकर यादव यांनी प्रास्ताविक केले. ॲड. एस. पी. इनामदार यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले. यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.