धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या, गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ, मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा गणल्या गेलेल्या या मंडळाच्या वतीने शहरात आज छापील पोम्प्लेट घरोघर व दुकानात, जनतेकडे प्रत्यक्ष भेटून वाटप करून, आपण मतदान करा व आपल्या समवेत कुटुंब , मित्रपरिवार या सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करा असा संदेश मंडळाचे कार्यवाह सदस्याने केले. 2014 व 2019 या निवडणुकी वेळी देखील मतदार राजा जागा हो, लोकशाही जिवंत ठेवा यासाठी देखील पत्रके वाटप करून मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मंडळ हे राष्ट्रीय कार्य व सामाजिक कार्य अनेक वर्षापासून करण्यात अग्रेसर असते. 

छापिल पत्रकामध्ये मतदार राजा मतदान करा. मतदाराचा हक्क बजावू या आणि प्रगत भारत घडवूया. मतदान हे भ्रष्टाचार, लाच लुचपत, अन्याय ,अत्याचार, यास प्रतिबंध करते. माझे एक मत देशासाठी- माझे एक मत परिवर्तनासाठी. मतदान लाचारी नव्हे- स्वाभिमानासाठी. लोकमंत्र की सुनो पुकार- मत खोना अपना मताधिकार. मतदान विकू नका- कोणाचीही मिंदे होऊ नका. मतदार राजा जागा हो - लोकशाहीचा धागा हो. अशा विविध घोषवाक्याने छापलेले पत्र वाटप केले आहे. 

समाज व राष्ट्रहितासाठी संकल्प करावा यासाठी सुद्धा या पॉम्पलेटमध्ये संदेश  देण्यात आला आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखावी, लेक वाचवावी. निसर्गप्रेमी होऊयात - पर्यावरण वाचवूयात. रक्तदान, देहदान, नेत्रदान, त्वचा दान, अवयवदान हेच खरे जीवनदान. अठरा वर्षाच्या आत मुलीचा 21 वर्षाच्या आत मुलाचा विचार करू नका विवाहाचा- अर्थ ध्यानात घ्या कायद्याचा. स्त्री-पुरुष एकसमान - जीवनात द्या सारखाच मान. टिकविता संपत्ती जलाची- शान वाढेल राष्ट्राची. इत्यादी समाज व राष्ट्रहिताच्या दृष्टीने संदेश मंडळाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. 

श्री गजाननच्या संकष्ट चतुर्थीच्या यावेळी मानाचा गणपती व धाराशिव चा महाराजा या मंदिरामध्ये पूजा विधी वेळी उपस्थित असलेल्या सर्व भक्तगण यांना सर्वांनी यावेळी जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वांनी शपथ घेतली. मंडळाचे पदाधिकारी गणेश दूत, गणेश भक्त व गणेश सेवक यांनी घरोघर व दुकानात जाऊन मतदान करा असे आवाहन केले आहे. या यशस्वीतेसाठी मनमत पाळणे, प्रा.गजानन गवळी, मूर्तिकार काशिनाथ दिवटे, संजय पाळणे, राजकुमार दिवटे, सागर पाळणे, बसवेश्वर पाळणे, विश्वास दळवी, वरून साळुंखे, मुझे मिल पठाण, रणजीत व सचिन बुरुंग, तोडकरी किरण, नंदकुमार हुच्चे ,युवराज हुच्चे श्रीकांत दिवटे ,आकाश महामुनी, राहुल गवळी, केदार उपाध्ये, दहीहंडे बंधू  सालपे बंधू ,संतोष मेहत्रे ,अंकुश पाटील, विद्यानंद साखरे ,दत्ता वाडकर, लक्ष्मण ओमासे, अतुल ढोकर, ऋषिकेश चवंडके, सच्चिदानंद पोतदार, सुनील देवळे, विशाल देशमाने यावेळी खास मुद्दाम उपस्थित असलेले केदार भोसले वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्र विक्रेत्याचे संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी या अशा विविध सामाजिक राष्ट्रीय कार्यामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. यावेळी देखील ते उपस्थित होते. महिला मंडळाच्या वतीने उज्वला दिवटे, अलका गवळी, सुरेखा- पुष्पा हुच्चे, अनुराधा पाळणे, कल्याणी उपाध्ये, साखरे परिवार, लगदिवे, दहीहंडे, भोपलकर, तोडकरी,  इत्यादी महिलांनी देखील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी पॉम्पलेट वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक, धार्मिक,पौराणिक, ऐतिहासिक व राष्ट्रहित, समाजहित यामध्ये अग्रेसर राहण्याचा प्रयत्न आज पर्यंत करीत आले आहे. उत्सवातून सामाजिक व ज्वलंत समस्येवर विविध प्रकारचे देखावे व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत महाराष्ट्रीयन पुरातन लेझीम सारख्या खेळाचे महत्व व व्यायाम इत्यादी देखील जन प्रबोधनात्मक करण्याचा प्रयत्न करीत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन व संयोजन प्रा. भालचंद्र हुच्चे यांचे मार्गदर्शन केले जात आहे.

 
Top