तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंगळवार दि.19 नोव्हेंबर रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन पत्नी रेश्माताई ठाकरे सह देवीचा कुलधर्म कुलाचार करुन मनोभावे तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या धार्मिक विधीचे पौराहीत्य ठाकरे घराण्याचे पारंपरिक पुजारी कुमार दिंगबर इंगळे त्यांचे चिरंजीव सागर इंगळे यांनी केले.
यावेळी त्यांच्या सोबत आमदार मिलींद नार्वेकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड. धिरज पाटील, शामल पवार, खरेदी विक्रि संघ चेअरमन सुनिल जाधव, शहर प्रमुख सुधीर कदम, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, अर्जुन सांळुके सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे त्यांच्या सौभाग्यवती रेश्माताई ठाकरे यांनी देवीदर्शन घेतल्यानंतर मुली, महिला, महिला पोलिस, नवविवाहीत नवदांम्पत्यांनी त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांना गराडा घातला होता. त्यांनी ही सर्वाना सेल्फी काढु दिले.