तुळजापूर (प्रतिनिधी)- 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी बूधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान असून मंगळवारी एकूण 1640 मतदान कर्मचारी मतदान साहित्य घेवुन  केंद्रावर रवाना झाले.

एकूण 410 मतदान केंद्रासाठी प्रत्येकी तीन पुरुष व एक महिला कर्मचारी असलेले पथक असून प्रत्येक पथकामध्ये एक पोलीस कर्मचारी आहे. 410 मतदान केंद्रासाठी 41 क्षेत्रीय अधिकारी नियुक्त असून त्यांच्यासोबत ही एक पोलीस/ सुरक्षा कर्मचारी व राखीव कर्मचारी देण्यात आलेले आहेत. क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे उद्या मतदानावेळी अडीअडचणीसाठी राखीव मशीन्स देण्यात येणार आहेत.

 
Top