तुळजापूर (प्रतिनिधी)-  लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदार संघात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची हवा चालली होती तशी हवा या विधानसभा सभा निवडणुकित चालणार का याची उत्सुकता  राजकिय पक्षांना लागली आहे.

श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठींब्यावर पहिला आमदार विजयी झाला असता अशी चर्चा राजकिय वर्तुळात  मतदार संघात  मोठ्या चविष्टतेने चर्चीली जात होती. त्याला आता पुर्ण विराम मिळाला आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागात जरांगे आदेशाचे पालन करणारा मतदार वर्ग मोठा आहे. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत अनुभवास मिळाला.

आताही सर्वच पक्षाचे इच्छुक मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना भेटुन आले. काही दिग्गज मंडळींनी तर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठींबा घेऊन निवडणुकीत उतरायचे ठरवले होते. त्यामुळे सर्वच उमेदवार समर्थकांनी तीन तारखेची राञ आंतरवाली सराटीत जागुन काढली. यावेळी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील एक बैठक झाली. तुमच्या तुन एक उमेदवार द्या असे जरांगे पाटलांनी सांगितले. पण त्यात यश आले नाही अखेर तुळजापूरची बैठक पहाटे घेण्याचे ठरले. पण तिथे प्रचंड इच्छुक संख्या, गर्दीमुळे बैठक होवु शकली नाही. सकाळी सांगतो असे जरांगे पाटलांनी सांगताच अनेकांचा उत्साह मावळला. अखेर सकाळी निर्णय आला. जरांगे पाटील निवडणूकीत उतरणार नाहीत. त्या नंतर माञ अनेक दिग्गज उमेदवारांनी निवडणूक मधुन माघार घेण्याचा निर्णय घेतला.

या राञीस झालेल्या खेळाचा पार्श्वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदार संघात जरांगे पाटील पाठींबावर मराठा समर्थक आमदार होण्यापासुन तुळजापूर तालुका वंचित राहिला. आता जरांगे पाटील तुळजापूर मतदार संघाबाबतीत काय भूमिका घेणार याकडे सर्वच लक्ष लागले आहे. माञ जरांगे पाटील यांच्या या निर्णयाबाबतीत मराठा समाजात संमिश्र प्रतिक्रिया माञ उमटत आहे.

 
Top