नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरात विकासाचा वेग तीपटीने वाढविण्यासाठी पुन्हा एकदा नळदुर्गकरांनी तुळजापुर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयी करावे असे आवाहन मल्हार पाटील यांनी दि. 6 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग शहरात प्रचाराचा शुभारंभ करताना केले.
दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा. नळदुर्ग येथे तुळजापुर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्राचाराचा शुभारंभ मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकमान्य वाचनालय येथील गणेश मंदिरात श्री गणेशाची पुजा करुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर लोकमान्य वाचनालय ते किल्ला गेट पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मल्हार पाटील, सुशांत भुमकर, संजय बताले, नय्यर जहागीरदार, पद्माकर घोडके,सुधीर हजारे, भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, श्रमिक पोतदार,संजय विठ्ठल जाधव, पांडु पुदाले, बंडु पुदाले, छमाबाई राठोड, निरंजन राठोड, सागर हजारे, अक्षय भोई, बबन चौधरी, गणेश मोरडे, युवासेनेचे निखिल घोडके, रिपाईचे बाबासाहेब बनसोडे,बापु दुरुगकर, योगेश सुरवसे, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नळदुर्ग शहर अध्यक्ष अजीज जुनैदी, गौस शेख, एस. के. बागवान, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, दत्तात्रय कोरे, अजय देशपांडे, शिरीष कुलकर्णी, मल्लिकार्जुन गायकवाड,ऍड. दीपक आलुरे, तुळजापुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन ऍड. आशिष सोनटक्के, विलास राठोड यांच्यासह भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गट व रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनालय ते किल्ला गेट पर्यंत तसेच साठे नगर व भीम नगर पर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शिवलिंगेश्वर हिरेमठ, मारुती मंदिर यासह विविध मंदिरात जाऊन मल्हार पाटील यांनी दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.
यानंतर शिवतीर्थ येथे असलेल्या शहर भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना मल्हार पाटील यांनी म्हटले की, गेल्या अडीच वर्षांपुर्वी राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरात विकास कामासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिला आहे. हा विकासाचा वेग तीपटीने वाढविण्यासाठी पुन्हा एकदा नळदुर्गकरांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मोठया संख्येने मतदान करुन विजयी करावे. नळदुर्ग शहरातील 1 हजार बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न यशस्वी होण्यासाठी पुन्हा एकदा राणा जगजितसिंह पाटील हेच आमदार म्हणुन निवडुन येणे गरजेचे आहे असे मल्हार पाटील यांनी म्हटले आहे.