तुळजापूर  (प्रतिनिधी) - तालुक्यातील मंगरुळ येथे  उपचारासाठी आलेल्या तरुणीस डाँक्टरने गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या डाँक्टरवर गुन्हा दाखल होवुन आज सात दिवस लोटले. तरी सदरील डाँक्टर अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने या प्रकरणी महिला वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या नराधमास पोलिस कधी गजाआड करणार असा सवाल करीत आहेत.

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील ओम साई क्लिनिक येथील डॉ. रमेश राजेंद्र लबडे याच्या विरोधात उपचारास दवाखान्यात आलेल्या युवतीवर अत्याचार केल्याची फिर्याद 1 नोव्हेंबर 2024 दिली होती. तेव्हा पासुन सदरील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे तपासा बाबतीत साशंकता व्यक्त केली जात आहे. या घटनेने पालक व मुलीमध्ये असुरक्षेचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे तुळजापूर तालुक्यातील शाळा, काँलेज मधील विद्यार्थींनी व  महिला सुरक्षेबाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सदरील डाँक्टर ऐवढा मोठा गुन्हेगार आहे का तो पोलिसांना सापडत नाही. या तपासाबाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

 
Top