धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 23.11.2024 रोजी  धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ उमरगा- 240, तुळजापूर-241, उस्मानाबाद- 242 व परंडा-243 मतमोजणी असल्याने मतमोजणी शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्याकरीता, कोणतीही अप्रिय घटना घडु नये,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निमार्ण होवू नये याकरीता जिल्ह्यामध्ये बंदोबस्तकामी 05 पोलीस उप अधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 100 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 1,494 पोलीस अमंलदार व 1,442 होमगार्ड तसेच निम्नलष्करी दलाच्या कंपन्या असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील 04 मतदार संघात लावण्यात आलेला बंदोबस्त खालील प्रमाणे- उमरगा- 240 येथे 01 पोलीस उप अधीक्षक, 03 पोलीस निरीक्षक, 17 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 332 पोलीस अमंलदार व 305 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तुळजापूर-241 येथे 01 पोलीस उप अधीक्षक, 04 पोलीस निरीक्षक, 23 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 373 पोलीस अमंलदार व 384 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

उस्मानाबाद- 242 येथे 02 पोलीस उप अधीक्षक, 06 पोलीस निरीक्षक, 30 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 401 पोलीस अमंलदार व 386 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.परंडा- 243 येथे 01 पोलीस उप अधीक्षक, 04 पोलीस निरीक्षक, 30 सपोनि/पोउपनि पोलीस अधिकारी, तसेच 388 पोलीस अमंलदार व 367 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मतमोजणी ठिकाणी कोणीही मोबाईल फोन/ईलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत ठेवू नये.


 
Top