धाराशिव (प्रतिनिधी) -धाराशिव येथील संघरत्न सुभाष नगदे याची तामिलनाडू राज्यातील कोईंबतूर येथे होणाऱ्या 62 व्या राष्ट्रीय इनलाईन हॉकी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सचिन पाटील, लघुपाटबंधारे विभागातील जलसंधारण अधिकारी सुभाष नगदे उपस्थित होते.

 
Top