तुळजापूर (प्रतिनिधी) -  तालुक्यातील तामलवाडी व होर्टी मुर्टा परिसरात दोन औद्योगिक वसाहती पाच वर्षात उभ्या करुन, तिथे बारा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देवुन अर्थकरणाला चालना देवुन, दरडोई उत्पन्न वाढविण्याचा आम्ही संकल्प केल्याची माहीती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पञकार परिषद घेऊन दिली. 

यावेळी पञकरांशी संवाद साधताना पाटील म्हणाले कि, तामलवाडी हा भाग सोलापूर पासुन सोळा किलोमीटर अंतरावर आहे. तिथे रेल्वे महामार्ग महामार्ग  व विमानतळ अशा सुविधा जवळ असल्याने या  परिसरात 370 एकर वर औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे. या साठी जमीन भूसंपादन  प्रक्रिया चालु आहे. येथे उद्योजक यावेत म्हणून सोलापूर येथील 150 उद्योजकांबरोबर दोन सकारात्मक  बैठका झाल्या. एका युनिट मध्ये 70 ते 90 लोकांना  रोजगार मिळणार आहे. 

तसेच तुळजापूर तालुक्यात 300 दिवस स्वच्छ प्रकाश मिळत असल्याने होर्टी, मुर्टा येथे सोलर प्रकल्प उत्पादन देणारे युनिट उभे केले जाणार आहेत. एमआयडीसी अँक्ट अंतर्गत शेतकऱ्यांशी वाटाघाटी करुन जमीनी भूसंपादन केले जाणार आहे. या औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस, अजित पवार व उद्योग मंञी उदय सावंत याचे मोठे योगदान लाभले आहे. यावेळी नारायण नन्नवरे, विनोद गंगणे, संतोष बोबडे, गोकुळ शिंदे, सचिन रोचकरी, श्रीकृष्ण सुर्यवंशी, बापुसाहेब भोसले उपस्थित होते.

 
Top