धाराशिव (प्रतिनिधी) - बाळासाहेबांनी कमवलेल्या धनुष्यबाण ची आन,बाण शान नियतीने आमच्या हतात दिली आहे. मात्र बाळासाहेबांनी कमवलेली शिवसेना कॉग्रेस च्या दावणीला बांधली. तो दिवस सर्वात दुर्देवी होता. असा जोरदार हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता विरोधकावर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धाराशिव जिल्ह्यात परंडा, धाराशिव व उमरगा येथे जाहीर सभा दि. 8 नोव्हेंबर रोजी झाली.
या सभेस भाजपचे आमदार तथा माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, अनिल खोचरे, सुरज साळुंखे, रिपाईचे राजाभाऊ ओव्हाळ, भाजपाचे मिलिंद पाटील, नितीन भोसले आदी उपस्थित होते. परंडा विधान सभा मतदार संघातील महायूतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत, धाराशिव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे व उमरगा येथील विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि 8 नोव्हेंबर रोजी परंडा, धाराशिव व उमरगा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली.
यावेळी शिंदे म्हणाले की लाडकी बहिन योजना बंद होणार असल्याच्या खोटया अफवा विरोधकाकडून करण्यात आल्या. मात्र हि योजना बंद होणार नाही, ज्यांना पैसे मिळाले नाही त्या सर्वांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील असा शब्द बोलताना दिला.
परंडा विधानसभा मतदार संघातून महायूतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राहुल मोटे यांच्यात मुख्य लढत होत आहे. तर धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील व शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यात लढत होत आहे. तर उमरगा येथे शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले विरुद्ध महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी यांच्यात लढत होत आहे. सभेस कार्यकर्त, मतदार मोठया संखेने उपस्थित होते.