धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा भरातून हजारो शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. जे कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य वर कार्यरत असतात त्यांनाही मतदानाचा अधिकार बजावता यावा. म्हणून निवडणूक विभागाकडून त्यांना पोस्टल मतपत्रिका देण्यात येते. त्यासाठी प्रशिक्षणात संबंधित कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती घेतली जाते व त्यांना पोस्टल बॅलेट देण्यात येतो. पण जिल्हाभारत असंख्य शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रुटी काढून त्यांना पोस्टल बॅलेट पेपर देण्यात आलेले नाहीत. अशांना मत पत्रिका देण्याची मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.

अशी अनेक शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे तक्रार केली आहे. राज्यात व जिल्ह्यात सर्व शिक्षक सर्वांनी मतदान करावे म्हणून जनजागृती करतात. पण महसूल विभागाच्या चुकीमुळे संबंधित  शिक्षक व कर्मचारीच मदनापासून वंचित राहू शकतात. बऱ्याच वेळी महिला व काही शिक्षक, कर्मचारी  यांना वेळेत या किचकट प्रक्रिये मुळे आवश्यक ती माहिती देता येत नाही व ते वंचित राहतात. तसेच सर्व मतदारांनी सर्वांनी मतदान करावे म्हणून प्रशासनाकडून व अनेक शाळेमधून ही जनजागृती करण्यात येते. जनजागृती करणारच कर्मचारी मतदानापासून वंचित राहू शकतो. तेव्हा कर्तव्यावर असणारा एकही शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून स्वतंत्र कक्ष स्थापना करून सर्वाना मतदानाचा अधिकार द्यावा व त्यांना पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करून द्यावे. 


 
Top